Beed News : बीड जिल्हा (Beed News) कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे कारागृह परिसरात खळबळ उडाली आहे. गणेश पवार असे मृत कैद्याचे (Beed News) नाव आहे. कैदी पवार चेक बाउन्स प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होता आणि आठ दिवसांपूर्वीच त्याला बीड जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते. याच कारागृहात वाल्मिक कराड, ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या माध्यमातून ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांना गंडा घालणारा आरोपी सुरेश कुटे, राजस्थानी मल्टिस्टेट फसवणूक प्रकरणातील आरोपी चंदूलाल बिहानी कैद आहे. crime मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास गणेश पवार यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी याबाबत कारागृहातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कारागृह (Beed News) प्रशासनाने तत्काळ त्याला बीड जिल्हा रुग्णालयातात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.