बेलपिंपळगाव येथील दिडशे रेशनकार्ड ऑनलाईन न झाल्यामुळे गोरगरीब अन्नधान्यापासून वंचित !
Updated On:

नेवासा : बेलपिंपळगांव (ता.नेवासा) येथील सुमारे दिडशे रेशनकार्डधारक गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाईन होण्याच्या प्रतिक्षेत असून पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे दिडशे कुटुंबांना शासनाच्या मोफत अन्नधान्य योजनेला मुकावे लागत आहे.
नेवासा पुरवठा अधिकारी व तहसील कार्यालयाशी ग्रामस्थांनी वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी करूनही नेवासा तहसिलदारांनी याबाबत कुठलीही दखल घेतलेली नसल्यामुळे बेलपिंपळगांवच्या ग्रामस्थांतून तहसिलदारांच्या भूमिकेबाबत आश्चर्याबरोबरच चिडही व्यक्त केली जात आहे.
बेलपिंपळगांवकरांना शासनाच्या अन्नधान्यापासून आणखी किती दिवस वंचित राहावे लागणार? असा संतप्त सवालही ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात असून दिडशे कुटूंबियांचे रेशनकार्ड त्वरीत ऑनलाईन न केल्यास आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्यावतीने रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.





