Beauty tips: प्रत्येकालाच मुलायम, गुलाबी आणि आकर्षक ओठ हवे असतात. पण अनेकदा कोरडे, फुटलेले किंवा फिकट पडलेले ओठ आपली सुंदरता कमी करतात. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांत ही समस्या अधिक वाढते. बाजारात जरी महागडे लिप फिलर्स आणि कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स उपलब्ध असले तरी ते नेहमीच सुरक्षित किंवा परवडणारे नसतात. अशावेळी नैसर्गिक उपाय हेच सर्वोत्तम ठरतात. घरच्या घरी काही सोप्या उपायांनी तुम्ही तुमचे ओठ सुंदर, नरम आणि गुलाबी ठेवू शकता. तेही कोणत्याही केमिकलशिवाय किंवा फिलर्सशिवाय. १. नियमित एक्सफोलिएशन करा जर तुम्हाला ओठ आकर्षक दिसावेत असं वाटत असेल, तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा ओठ एक्सफोलिएट करा. मध आणि बारीक साखर एकत्र करून हलका स्क्रब तयार करा आणि त्याने ओठ हलक्या हाताने घासा. मात्र, साखर फार जाडसर नसावी, नाहीतर ओठांना इजा होऊ शकते. २. रोज रात्री नारळाच्या तेलाने मसाज करा हिवाळ्यात ओठ कोरडे पडू नयेत म्हणून दररोज झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाने हलका मसाज करा. त्यामुळे ओठ हायड्रेट राहतात आणि त्यांची नैसर्गिक चमक टिकून राहते. ३. एलोवेरा जेल लावा एलोवेरा जेल ओठांना ओलावा आणि मऊपणा देतो. शक्य असल्यास ताजे एलोवेरा जेल वापरा. त्यामुळे अधिक चांगला परिणाम दिसून येईल. ४. सनस्क्रीन लावायला विसरू नका चेहऱ्यावर जशी सनस्क्रीन वापरतो, तशीच ओठांवरसुद्धा सन प्रोटेक्शन आवश्यक आहे. बाहेर पडताना एसपीएफयुक्त लिप बाम किंवा लिप सनस्क्रीन लावा, म्हणजे सूर्याच्या किरणांमुळे ओठ कोरडे होणार नाहीत. ५. चांगल्या लिप बामचा वापर करा ओठांच्या सौंदर्यासाठी उत्तम दर्जाचा लिप बाम वापरणं गरजेचं आहे. बाजारात विविध प्रकारचे लिप बाम उपलब्ध आहेत. जे कोरडेपणा, फाटके आणि काळसरपणा दूर करून ओठांना सुंदर बनवतात. या लेखातील माहिती सामान्य जागरूकतेसाठी दिली आहे. त्वचा किंवा ओठांशी संबंधित गंभीर समस्या असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.