Beauty tips: हिवाळ्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे त्वचा कोरडी पडणे. बाजारातील अनेक क्रीम आणि लोशन त्वचेला कधी चिकट बनवतात, तर कधी काही वेळातच ताणलेली, खवखवीत वाटू लागतात. त्यातले रसायनयुक्त घटक त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी करतात. यासाठी घरच्या घरी केलेले नैसर्गिक आणि केमिकल-फ्री मॉइश्चरायझर हे सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक उपाय ठरते. अशा मॉइश्चरायझरमुळे त्वचेला खोलवर ओलावा मिळतो आणि ती दिवसभर मऊ राहते. खाली दिलेल्या तीन सोप्या पद्धतींनी तुम्ही घरच्याघरी मॉइश्चरायझर बनवू शकता. १) शिया बटर मॉइश्चरायझर साहित्य : शिया बटर – २ चमचे नारळ तेल – १ चमचा व्हिटामिन-E – १ कॅप्सूल कृती : शिया बटर हलकेसे गरम करून वितळवा. त्यात नारळ तेल आणि व्हिटामिन-E मिसळा. हे मिश्रण नीट हलवून १-२ तास फ्रीजमध्ये ठेवून सेट करा. हा मॉइश्चरायझर त्वचेला खोलवर पोषण देतो आणि त्वचा मऊ ठेवतो. २) तूप–अॅलोवेरा मॉइश्चरायझर साहित्य : तूप – १ चमचा अॅलोवेरा जेल – १ चमचा कृती : एका वाटीत अॅलोवेरा जेल घ्या आणि त्यात समान प्रमाणात तूप मिसळा. व्यवस्थित ढवळून दिवसातून एकदा वापरा. अतिशय कोरडी किंवा फाटलेली त्वचा असल्यास हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. ३) ऑलिव्ह ऑईल–अॅलोवेरा मॉइश्चरायझर साहित्य : ऑलिव्ह ऑईल – १ चमचा अॅलोवेरा जेल – १ चमचा कृती : दोन्ही घटक नीट मिसळा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून लावा. दररोज वापरल्याने त्वचेला पोषण मिळते, कोरडेपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. ही माहिती सर्वसाधारण जागरूकतेसाठी देण्यात आली आहे. त्वचेबाबत कोणतीही वैद्यकीय समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.