Beauty Skin: अंगणातील फक्त ४-५ पानं करतील कमाल! “७ दिवसांत त्वचा चमकेल”, जाणून घ्या सोपा घरगुती उपाय

Beauty Skin: सणांच्या काळातील धावपळीमुळे अनेकांना थकवा जाणवतो. याचा परिणाम फक्त शरीरावर नाही तर चेहऱ्याच्या त्वचेवरही दिसतो. ती कोरडी, निस्तेज आणि बेजान होते. अशा वेळी बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा घरगुती उपाय अधिक परिणामकारक ठरू शकतात. ज्याने केवळ सात दिवसांत त्वचा उजळते आणि नैसर्गिक तेज परत मिळते.
उपायासाठी लागणाऱ्या वस्तू
तुळशीची ४–५ पानं
चिमूटभर हळद
कच्चं दूध
(सर्व घटकांची मात्रा त्वचेच्या गरजेनुसार ठरवू शकता.)
कस वापरायच?
1. तुळशीची पानं वाटून घ्या.
2. त्यात चिमूटभर हळद घाला.
3. आता त्यात थोडं कच्चं दूध टाकून नीट मिसळा.
4. ही पेस्ट रोज १० मिनिटे चेहऱ्यावर लावा.
5. सात दिवसांमध्ये त्वचेचा निस्तेजपणा कमी होऊन चेहरा उजळ दिसू लागेल.
घटकांचे फायदे
तुळस:
तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. हे पानं चेहऱ्यावरील मुरुमं, पिंपल्स आणि एलर्जी कमी करण्यात मदत करतात. यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजी दिसते.
हळद:
हळदीत कर्क्युमिन असतो, जो एक प्रभावी अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक आहे. तो चेहऱ्यावरील डाग-धब्बे कमी करून रंगत निखारतो आणि वृद्धत्वाचे चिन्ह कमी करतो.
कच्चं दूध:
दुधात लॅक्टिक अॅसिड असतं, जे मृत त्वचा पेशी काढून टाकतं आणि त्वचेचं ओलसरपण टिकवून ठेवतं. त्यामुळे त्वचा मऊ, स्वच्छ आणि चमकदार दिसते.
हे सगळं वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित आहे.
फक्त काही नैसर्गिक घटकांच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा ग्लो परत मिळवू शकता. तुळस, हळद आणि दूध यांचा हा सोपा आणि परवडणारा नुस्खा ७ दिवसांतच त्वचेला नवीन तेज देऊ शकतो.


