अहमदनगर । जुन्या वादाच्या कारणावरून तलवारीने मारहाण

सोनई – नेवासा तालुक्यातील वाटापूर ते करजगाव रोडवर मोरे वस्ती, अमळनेर येथे जुन्या वादाच्या कारणावरून तलवारीने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पांडुरंग दत्तात्रय पवार (वय 24, रा. वाटापूर, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली. दि. 18 रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वाटापूर ते करजगाव रोडवर मोरे वस्ती, अमळनेर येथे जुन्या वादाच्या कारणावरून पांडुरंग पवार यास धक्का दिला. पांडुरंग गाडीवरून खाली पडला. तुमच्यामुळे मी गाडीवरून खाली पडलो, असे पांडुरंग म्हणाला असता बंटी औटी याने तू खूप माजलास का, असे म्हणून त्याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने पांडुरंगच्या दंडावर व हातावर मारहाण केली.
त्याचवेळी तमनर , पका थोरात, शरद चोपडे हे त्यांच्या स्वीफ्ट कारमधून खाली उतरले. त्यांनी पांडुरंग यास लाथाबुक्क्यानी मारहाण केली. हातातील तलवारीने पांडुरंगाच्या पाठीवर वार करून केले. यावेळेस वाचलास तू, परत भेटल्यास जिवंत सोडणार नाही, असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सोनई पोलीस ठाण्यात शरद निवृत्ती चोपडे, बंटी औटी (रा. वाटापूर), प्रकाश थोरात (रा.तमनर आखाडा ता.राहुरी), तमनर (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक बी.एम. तागड करीत आहेत.





