दारू पित बसलेल्या दोघांना मारहाण
Updated On:

पिंपरी – बंद टपरीसमोर दारू पित बसलेल्या दोघांना मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवारी (दि. 30) पहाटे साडेबारा वाजता सोनीगरा मैदान, रुपीनगर, तळवडे येथे घडली.
विकास अनिल शिंदे (वय 32, रा. निगडी) आणि दिगंबर मधुकर मानकरी अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी विकास शिंदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोहसीन युसुफ तांबोळी (वय 22, रा. रुपीनगर) आणि त्याच्या दोन ते तीन साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचे दोन मित्र एका बंद टपरीसमोर दारू पित असताना आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. यातून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना मारहाण केली.





