घोड्याच्या रेससाठी पैसे लावल्यानंतर पावती मागितल्याच्या कारणावरून मारहाण
Updated On:

पुणे- घोड्याच्या रेससाठी पैसे लावल्यानंतर पावती मागितल्याच्या रागातून एकाला गंभीर मारहाण करून अडीच लाख रुपये काढून घेतल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलाउद्दिन जहिरुद्दीन शेख (52, रा. मेहरअलीगंज, एनआयबीएम रोड, कोंढवा) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत मानविंदरसिंग नंदा (59, रा. दक्षिण पार्क, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी आर. एस. असोसिएट्स स्टॉलसमोर रेसकोर्स येथे घडला.
फिर्यादी हे त्यांच्या मुलासोबात मित्राला भेटण्यासाठी रेसकोर्स येथे गेले असता, त्यांनी स्टॉलवर घोड्याच्या रेससाठी पैसे लावले. त्यानंतर पावती मागितल्यानंतर ती देण्यास नकार दिल्याने झालेल्या बाचाबाचीतून शेखने फिर्यादीला मारहाण केली.





