पिंपरी -बॅट परत मागितल्यामुळे तरुणाच्या डोक्यात बॅट मारून गंभीर जखमी केले. ही घटना पिंपरी येथे घडली.
फैजल इस्माईल शेख (वय 23, रा. कासारवाडी), अविनाश सुभाष फुलवले (वय 25, रा. दिघी), दीपक मोहिते (रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. सुमित रामलाल गुप्ता (वय 48, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी फैजल आणि अविनाश यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे बॅट पाहण्यासाठी मागितली. फिर्यादी यांनी बॅट परत मागितली असता आरोपींनी त्यांच्या डोक्यात बॅटने मारली.