मकरंद आबांवर कणभर उपकार करा, आबा मणभर मदत करतात

वाई – आमदार मकरंद पाटील यांना मी कित्तेक वर्षापासून ओळखतो. मकरंद आबांच्यासारखा जातीय सलोखा राखणारा, सर्वांसाठी झटणारा, जनतेच्या कायम संपर्कात राहणारा आणि दानशूर नेता वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघाला लाभला आहे. मकरंद आबांच्या वर कणभर उपकार केले तर ते त्याची परतफेड मणभर मदत करून करतात याचा अनुभव माझ्यासह संपूर्ण जिल्ह्याने घेतला आहे, असे प्रतिपादन भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले. महाबळेश्वर, गुताड याठिकाणी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात धैर्यशील कदम बोलत होते.
याप्रसंगी आ. मदार मकरंद पाटील, भाजपचे सरचिटणीस बलशेठवार, वाई विधानसभा संयोजक अजय मांढरे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपूरे, महाबळेश्वर तालुका प्रभारी शेखर भिलारे, भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष उषा ओंबळे, महाबळेश्वर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली भिलारे, तालुका सहप्रभारी तानाजी भिलारे, महाबळेश्वर शहर भाजप उपाध्यक्ष मोहन गोळे, महाबळेश्वर शहर अध्यक्ष प्रशांत भोईटे, उपाध्यक्ष विजय बिरामने, महेंद्र परदेशी, युवा अध्यक्ष रवींद्र शिंदे, शहर प्रभारी राजेंद्र पवार, सहप्रभारी अनिल परदेशी, कार्यकारिणी सदस्य संतोष कवी, मंगेश उपाध्याय, रवी कुंभार, शिवसेना नेते प्रवीण भिलारे, अनिल लाघी उपस्थित होते.
धैर्यशील कदम म्हणाले, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीच सरकार येणार आहे. आपण महायुतीचा धर्म पाळून मकरंद आबा यांना पूर्ण ताकत देऊन, प्रचंड मतदान करून,विजयी करायचं आहे. सरकारने वीज बील माफ करण्याचे काम राज्य सरकारने केलं आहे. हे सरकार सर्वांसाठी आहे.
मकरंद पाटील म्हणाले, भाजप शिस्तबध्द पार्टी आहे. प्रत्त्येक कार्यकर्ता दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो. महायुतीचे सरकार अतिशय सक्षमपणे काम करतय. सरकारचा निर्णय घराच्या चुलीपर्यंत येतो यासारखं सरकार नाही.आपल्या मतदार संघातील १७५००० भगिनी पैकी १०७००० भगिनींच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत. सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली आहे.
साडेसात एच पी पर्यंत बिल शेतकऱ्यांना येणारच नाही.वर्षाला ४४००० रुपये लोकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे सरकारच ध्येय आहे.मी कधीही कुणालाही दुखावलं नाही.मी पक्ष,जात,गट कधीही पाहिले नाहीत. जो जो माझ्याकडे आला त्याचे प्रत्येक काम केलं. कारण मी या संपूर्ण मतदार संघाचा आमदार आहे. त्यांचं पालकत्व मी स्वीकारलं आहे. तुमची कुठलीही कामे असू द्या, कुठलाही संकोच न करता माझ्याकडे या. त्या प्रत्त्येक कामाला न्याय देऊन प्रत्त्येक काम १०० टक्के करणारच.
राजेंद्र राजपूरे म्हणाले, मकरंद आबा यांचं कार्य खूप मोठ आहे. धर्म, जात गट या गोष्टी आबांनी कधीच मानल्या नाहीत. शहर आणि ग्रामीण भागातील भाजपाची सगळी मते मकरंद पाटील यांनाच पडणार याची आम्हाला खात्री आहे.
अजय मांढरे म्हणाले, मकरंद पाटील विजयाचा चौकार नक्की मारतील.आबांच्याकडे जस राष्ट्रवादीच पालकत्व आहे तसेच आता महायुती चे सुध्दा पालकत्व आले आहे.
या प्रसंगी महाबळेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.





