पुणे- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच नागरिक आपल्या घरात असून, वर्क फ्रॉम होम आणि घरातील इतर कामे करताना दिसत आहेत.
दरम्यान, या काळात तुम्हाला थकवा जाणवतो अशा वेळेस गरज भासते ती म्हणजे एनर्जी ड्रिंक्सची. सध्या बाजारातील एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकतात म्हणून, आज आम्ही तुम्हाला काही खास अश्या नॅचरल ड्रिंक्स बद्दल सांगणार आहोत.
लिंबू पाणी – जसं की सर्वांना ठाऊकच आहे की लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. व्हिटॅमिन सी शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला वाढवते. आणि शरीरास नवी एनर्जी देतं. त्यामुळे या काळात लिंबू पाणीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
शहाळ्याचं पाणी – शहाळं किंवा नारळ हे शरीरामधील झालेली पाण्याची कमीला पूर्ण करून शरीरास एनर्जी शक्ती देतं. ह्या मध्ये नैसर्गिकरीत्या पोटॅशिअम पाण्याची कमी होऊ देतं नाही.
ताक – उन्हाळ्यात अनेक घरांमध्ये ताक प्यायलं जातं. ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरतं. या दिवसात अन्न पचवण्यासाठी ताकाचे सेवन करावे. याने पोटाची उष्णता कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टी – हे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे शरीराला उत्स्फूर्तता म्हणजेच एनर्जी मिळते. आपण व्यायामानंतर ग्रीन टी पिणे योग्य ठरेल. हे आपल्यास एनर्जी देण्याचे काम करतं.
दूध – लहानपणा पासूनच आपल्याला शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हे सगळ्यांसाठी फायदेशीर असतं. दूधात अधिकाधिक पोषक तत्व असतात. त्यामुळे दूध कधीपण आपल्या शरीरासाठी योग्य आहे.