नगर – विधानसभा निवडणूक खर्चाबाबतचे काम हे दक्षता पूर्वक करावे. तसेच विधानसभा निवडणुका ह्या भयमुक्त व पारदर्शीपणे पार पाडण्याकरिता उमेदवारांनी केलेल्या सर्व प्रकारच्या खर्चाच्या नोंदी काळजीपूर्वक नोदवण्याची दक्षता घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.
विधानसभा निवडणूक-2019 साठी विधानसभा मतदारसंघ निहाय नियुक्त सहाय्यक खर्च निरीक्षक तसेच निवडणूक खर्च संनियंत्रण करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी नियोजन भवन येथे प्रशिक्षण घेण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, जिल्हा कोषागार अधिकारी महेश घोडके, अनिल गिते आदी उपस्थित होते.