कोलकाता – बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly )यांना रविवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पण….. डॉक्टरांनी गांगुली यांना काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर प्रकृतीसंबंधी काही गोष्टींचे कडक पालन करण्यासही सांगितले आहे, ज्यामध्ये आहाराचा मुख्यत्वेकरून समावेश आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये गांगुली यांनी काम करू नये किंवा कामाचे दडपण घेऊ नये, असेही त्यांना डॉक्टरांनी सांगितले आहे.
गांगुली यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर गांगुली यांना घरी सोडण्यात आले. गांगुली यांची काही दिवसांपूर्वी अँजिओग्राम आणि काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचा अहवाल आल्यावर गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हृदय रोगतज्ञ डॉ. देवी शेट्टी व अश्विन मेहता यांच्या उपस्थित गांगुली यांच्यावर दुसरी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती तसेच आणखी दोन स्टेन्टही बसवण्यात आले होते.
या महिन्याच्या प्रारंभीही गांगुली यांना हृदयविकारचा सौम्य झटका आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांची ऍन्जिओप्लास्टी करण्यात आली होती व एक स्टेन्टही बसवण्यात आला होता. त्यानंतर प्रकृती सुधारल्यावर त्यंना घरी सोडण्यात आले होते.
मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची पुन्हा अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती तसेच आणकी दोन स्टेन्टही बसवण्यात आले होते. त्यानंतर गांगुली यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले.