#IPL2020 : चेन्नई संघाला बीसीसीआयचा झटका
Updated On:

नवी दिल्ली –आयपीएल स्पर्धेच्या तयारीसाठी 10 ऑगस्टला अमिरातीत जाण्याचे जाहीर केलेल्या चेन्नई सुपर किंग संघाला बीसीसीआयने झटका दिला आहे. ठरलेल्या निर्णयांनुसार सर्व संघांना 20 ऑगस्टपूर्वी अमिरातीत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व संघांसाठी नियम सारखेच आहेत, असे स्पष्ट करत बीसीसीआयने चेन्नईला स्पष्ट नकार दिला आहे.
गेल्या मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार होती. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा लांबणीवर टाकली गेली, आता नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे.





