BCCI New T20 Tournament from the next season : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीत भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देशांतर्गत क्रिकेटच्या रचनेत (स्ट्रक्चर) मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय खेळाडूंना टी-२० क्रिकेटच्या वेगवान आणि आधुनिक गरजांनुसार तयार करण्यासाठी एक नवीन टी-२० स्पर्धा सुरू करणार आहे. विशेष म्हणजे ही नवी स्पर्धा ५० षटकांच्या (वनडे) चालू स्पर्धेची जागा घेणार असल्याचे बोलले जात आहे. स्टेट ‘ए’ चॅम्पियनशिप आता टी-२० फॉरमॅटमध्ये रंगणार – बीसीसीआय सध्या २५ वर्षांखालील (Under-23) पुरुषांची व्हाईट-बॉल स्पर्धा ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये आयोजित करते, ज्याला ‘स्टेट ए चॅम्पियनशिप’ म्हटले जाते. आता ही स्पर्धा पूर्णपणे बंद करून त्याऐवजी ती टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्याची योजना आखली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा बदल आगामी देशांतर्गत हंगामापासून लागू होऊ शकतो. परंतु, राज्य क्रिकेट संघटनांना अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृत पत्र किंवा औपचारिक सूचना पाठवण्यात आलेली नाही. सध्या ही स्पर्धा एलिट आणि प्लेट अशा दोन श्रेणींमध्ये खेळवली जाते, ज्यामध्ये एलिट श्रेणीत तामिळनाडू तर प्लेट श्रेणीत मेघालय विद्यमान चॅम्पियन आहे. युवा खेळाडूंना आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी फायदा – STORY | BCCI mulls converting U23 50-over tournament to T20 format The Board of Control for Cricket in India (BCCI) is mulling to convert the national Under-23 men’s 50-over tournament to T20 format from the upcoming domestic season. READ: https://t.co/RpNE8tXNax pic.twitter.com/vscIY7IfAw — Press Trust of India (@PTI_News) May 17, 2026 बीसीसीआयचा हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. यामुळे युवा खेळाडूंना टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याचा अधिक सराव मिळेल. तसेच त्यांना दडपणाखाली मोठे शॉट्स खेळण्याचा आणि परिस्थिती हाताळण्याचा मौल्यवान अनुभव मिळेल, जो भविष्यात आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. या स्पर्धेमुळे भारताला टी-२० फॉरमॅटसाठी तळागाळातून आणखी नवे मॅचविनर खेळाडू शोधणे सोपे होणार आहे. हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशी ठरला षटकारांचा नवा बादशहा! अभिषेक शर्माला मागे टाकत आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास नियम असूनही वैभव सूर्यवंशीला खेळणे कठीण? या स्पर्धेच्या नियमांनुसार २३ वर्षांपर्यंतचे खेळाडू यात खेळण्यास पात्र असतात. या निकषानुसार राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी या स्पर्धेत खेळू शकतो. मात्र, ज्युनिअर स्तरावरील या स्पर्धा अनेकदा सीनियर स्पर्धांच्या काळातच खेळवल्या जातात. वैभव सूर्यवंशी हा आधीच बिहारच्या मुख्य सीनियर संघाचा नियमित भाग असल्याने, त्याला या अंडर-२३ स्पर्धेसाठी निवडले जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे तो या नव्या स्पर्धेत खेळताना दिसण्याची चिन्हे धूसर आहेत.