BCCI Brand Cast Engineer Death : आयपीएल 2026 हंगामासाठी भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट टीममधील एका ब्रिटिश नागरिकाचा मृतदेह (BCCI Brand Cast Engineer Death) मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडंट हॉटेलच्या खोलीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव इयान विल्यम्स लँगफोर्ड असे असून, तो मूळचा ब्रिटिश नागरिक होता. २४ मार्चपासून तो ट्रायडंट हॉटेलमध्ये आयपीएलच्या ब्रॉडकास्टिंग (BCCI Brand Cast Engineer Death) कामासाठी वास्तव्यास होता. सध्या या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. नेमकं काय घडलं? २९ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या ब्रॉडकास्टिंगसाठी इयान विल्यम्स लँगफोर्ड वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते. BCCI Brand Cast Engineer Death सामना संपल्यानंतर ते रात्री आपल्या खोली क्रमांक २७१५ मध्ये परतले. दुसऱ्या दिवशी, म्हणजे ३० मार्च रोजी हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने त्यांच्या खोलीत फोन केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर हॉटेल कर्मचारी त्यांच्या खोलीवर गेले. आतून कोणताही आवाज किंवा प्रतिसाद न मिळाल्याने मास्टर कीने खोली उघडली. खोलीत शिरताच कर्मचाऱ्यांना इयान विल्यम्स लँगफोर्ड हे खाली पडलेल्या अवस्थेत आढळले. तातडीने हॉटेलच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद दाखल केली असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत आणि सर्व शक्यता विचारात घेत आहेत. इयान विल्यम्स लँगफोर्ड (BCCI Brand Cast Engineer Death) हे बीसीसीआयच्या अधिकृत ब्रॉडकास्ट टीममधील इंजिनिअर होते. आयपीएल २०२६ हंगामातील सामन्यांच्या ब्रॉडकास्टिंगसाठी ते मुंबईत आले होते. हॉटेलमध्ये ते २४ मार्चपासून राहत होते. ही घटना आयपीएल हंगामाच्या सुरुवातीच्या काळात घडल्याने क्रिकेट विश्वातही चर्चेला उधाण आले आहे. सध्या पोलीस तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसली तरी, सर्व बाजूंचा सखोल अभ्यास केला जात आहे.