BCCI Bans Arshdeep Singh Vlogging : आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये मैदानातील खेळासोबतच मैदानाबाहेरील खेळाडूंच्या वर्तणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयने पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्यावर कडक कारवाई करत त्याच्या ‘व्लॉग’ बनवण्यावर तातडीने बंदी घातली आहे. अर्शदीपने सोशल मीडियावर पोस्ट केलेले काही व्हिडीओ वादाचे कारण ठरल्याने बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. वादाची मालिका आणि व्लॉगिंगवर बंदी – अर्शदीप सिंग मागील काही दिवसांपासून पंजाब किंग्सच्या खेळाडूंसोबतचे पडद्यामागचे व्हिडीओ आणि व्लॉग बनवून सोशल मीडियावर शेअर करत होता. मात्र, यातील काही व्हिडिओंमुळे नकारात्मक वातावरण निर्माण झाले. एका व्हिडीओत अर्शदीप सहकारी खेळाडू शशांक सिंहच्या कॅचिंगची थट्टा करताना दिसला, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये युझवेंद्र चहल चक्क ई-सिगारेट (Vaping) ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला. या सर्व बाबींमुळे स्पर्धेच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे बीसीसीआयचे मत आहे. ७ मे रोजी खेळाडूंच्या वर्तणुकीबाबत जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर अर्शदीपला उर्वरित हंगामात कोणतेही व्हिडीओ न बनवण्याचे आणि सोशल मीडियावर काहीही पोस्ट न करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा आणि ‘हनी ट्रॅप’चा धोका – Arshdeep Singh has reportedly been asked by Punjab Kings to pause his popular vlogging content during the IPL season 🎥🏏 pic.twitter.com/MAyCOvEAL6 — Home of T20 (@HomeofT20) May 8, 2026 बीसीसीआयने केवळ अर्शदीपवरच नाही, तर सर्वच खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कडक निर्बंध लादले आहेत. आयपीएल वेन्यू आणि हॉटेलशी संबंधित कोणतीही सामग्री सोशल मीडियावर टाकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अनेक खेळाडू आपल्या गर्लफ्रेंडसोबत प्रवास करत असल्याचे आणि हॉटेलमध्ये राहत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अँटी करप्शन युनिटने (ACU) धोक्याचा इशारा दिला आहे. खेळाडू ‘हनी ट्रॅप’ किंवा लैंगिक वादात अडकू शकतात, अशी भीती बोर्डाने व्यक्त केली आहे. हेही वाचा – Arshdeep Singh Troll : मैदानात धावांची खैरात अन् बाहेर गर्लफ्रेंडची बॅग! अर्शदीप सिंगवर चाहते भडकले; म्हणाले, “आता हेच काम…” शिस्तीचा बडगा – Vice president of BCCI “Rajeev Shukla” takes a dig at Arshdeep Singh and Hardik Pandya🎙; We are planning to implement new rules for players regarding several issues such as ‘Prohibiting unauthotised people from meeting players and banning players from vlogging during the IPL’.… pic.twitter.com/3CuMkKXrF7 — Gillfied⁷ (@Gill_Iss) May 8, 2026 या हंगामात शिस्तीचे उल्लंघन होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग करताना आढळला होता, तर टीम मॅनेजर रोमी भिंडर डगआउटमध्ये मोबाईल वापरताना दिसले होते. या सर्व प्रकारांमुळे बीसीसीआयने आता अनाधिकृत लोकांच्या प्रवेशावर आणि खेळाडूंच्या हॉटेलमधील हालचालींवर कडक पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.