BCCI Domestic Schedule Announce : बीसीसीआयने आगामी २०२६-२७ या देशांतर्गत (डोमेस्टिक) क्रिकेट हंगामाच्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या संपूर्ण हंगामात पुरुष आणि महिला क्रिकेटच्या वेगवेगळ्या वयोगटात आणि फॉरमॅटमध्ये मिळून तब्बल १,७८८ सामने खेळवले जाणार आहेत. पुरुष गटात सीनियर, अंडर-२३, अंडर-१९ आणि अंडर-१६ च्या स्पर्धा होतील; तर महिला गटात सीनियरसह अंडर-२३, अंडर-१९ आणि अंडर-१५ च्या लढती पाहायला मिळतील. या भव्य क्रिकेट हंगामाची सुरुवात २३ ऑगस्ट २०२६ पासून ‘दुलीप ट्रॉफी’ने होणार आहे. रणजी ट्रॉफी दोन टप्प्यांत; खेळाडूंना मिळणार विश्रांती – क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असलेल्या ‘रणजी ट्रॉफी’ आणि ‘कर्नल सी.के. नायडू ट्रॉफी’ यंदाही दोन टप्प्यांत खेळवली जाणार आहे. यामुळे खेळाडूंना दुखापतींपासून वाचण्यासाठी आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल. रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुपमध्ये ३२ संघांना ४ गटांत विभागण्यात आले आहे, तर प्लेट ग्रुपमध्ये ६ संघ असतील. रणजी ट्रॉफीचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या काळात रंगेल. त्यानंतर दुसरा टप्पा १७ जानेवारी २०२७ पासून सुरू होईल, तर बाद फेरीचे (नॉकआउट) सामने ९ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२७ दरम्यान खेळवले जातील. मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीचे बिगुल वाजले – 🚨 News 🚨 BCCI announces the schedule for the Indian Domestic Season 2026-27, which will feature 1,788 matches across age groups and formats in men’s and women’s cricket. More Details 🔽 | @IDFCFIRSTBank https://t.co/eWfVBxBNkQ — BCCI Domestic (@BCCIdomestic) May 20, 2026 टी-२० फॉरमॅटमधील प्रसिद्ध ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’चा थरार १४ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार असून, ६ डिसेंबरपर्यंत नॉकआउट सामने संपतील. यानंतर लगेचच १४ डिसेंबरपासून वनडे फॉरमॅटमधील ‘विजय हजारे ट्रॉफी’ला सुरुवात होईल, ज्याचे नॉकआउट सामने २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२७ या काळात खेळवले जातील. त्याआधी, ६ झोनल संघांचा समावेश असलेली दुलीप ट्रॉफी २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात पार पडेल, तर १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान ‘इराणी कप’ खेळवला जाईल. हेही वाचा – Sanjiv Goenka Post : ‘एक दिवस संपूर्ण जग तुझ्या पायाशी असेल…!’ ज्या पोराने लखनौला धुतलं, त्याच्यासाठीच संजीव गोयकांची भावनिक पोस्ट युवा खेळाडूंसाठी बीसीसीआयचा मास्टरप्लॅन – या हंगामात बीसीसीआयने टी-२० क्रिकेटवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून अंडर-२३ पुरुषांची ‘स्टेट ए ट्रॉफी’ आणि ‘विजी ट्रॉफी’ आता ५० षटकांच्या फॉरमॅटऐवजी पूर्णपणे टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. तसेच, युवा खेळाडूंना अधिक संधी देण्यासाठी कर्नल सी.के. नायडू ट्रॉफीचा विजेता संघ आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’ यांच्यातील ऐतिहासिक सामना पुन्हा सुरू करण्यात येत असून, तो १ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान खेळवला जाईल.