#CWC22 | मानधना लवकरच तंदुरुस्त होईल – बीसीसीआय
Updated On:

ऑकलंड – भारताच्या महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या कानाला चेंडू लागल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तिची प्रकृती स्थिर असून ती लवकरच पूर्ण तंदुरुस्त होईल, असा निर्वाळा बीसीसीआयने दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात फलंदाजीदरम्यान मानधनाच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. यामुळे तिला मैदान सोडावे लागले होते. मात्र, तिची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.





