बारामती : ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून बारामतीच्या नटराज नाट्य कलामंडळ या संस्थेच्या कर्ण या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे या संस्थेच्या वामन आख्यान या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि झाड जीवन फाऊंडेशन या संस्थेच्या भिरुड या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केली. दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड केली आहे. पुणे येथे भरत नाट्य संशोधन मंदिरात जल्लोषात झालेल्या स्पर्धेत एकूण ३० नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीपाद जोशी, श्रीनिवास एकसंबेकर, पूनम चांदोरकर यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी संघ तसेच कलाकारांचे अभिनंदन केले. अभियानात बरड, वामन आख्यानचा दबदबा अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे महेश गावडे (नाटक-बरड), प्रांजळ पडळकर (नाटक- वामन आख्यान), योगेश तपस्वी (नाटक-शनिवार रविवार), चंद्रकांत मुळगुंदकर (नाटक-मिच्च काळ्या रंगात बुडवून), प्रशांत गौडा (नाटक- इथे ओशाळला मृत्यू), अंजली धारु (नाटक-हृदयी संत फुलताना), नीलम वाडेकर (नाटक- बरड), सायली कुबडे (नाटक-कर्ण), अन्विता गोखले (नाटक-परिभ्रमण), साक्षी परकाळे (नाटक-भिंत काचेची). दिग्दर्शनातही अव्वल स्थान स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे अन्य निकाल पुढीलप्रमाणे- दिग्दर्शन : प्रथम- विनीता जोशी (नाटक-कर्ण), द्वितीय- प्रा. शुभंकर वाघोले (वामन आख्यान), तृतीय- प्रणव भोसले (भिरुड), प्रकाश योजना प्रथम- चेतन ढवळे (कर्ण), द्वितीय- निखिल मारणे (आनंमठ, मिशन वंदे मातरम्), तृतीय- निखिल मारणे (वामन आख्यान), नेपथ्य प्रथम- जयंत टोले (आनंदमठ, मिशन वंदे मातरम्), द्वितीय- ऋतुजा बोठे (वामन आख्यान), तृतीय- विशाल दुराफे (लगबत) रंगभूषा प्रथम- अरविंद सूर्या (वामन आख्यान), द्वितीय- अरविंद सूर्या (आनंदमठ, मिशन वंदे मातरम्), तृतीय- नरेंद्र वीर (हृदयी संत फुलताना) संगीत दिग्दर्शन: प्रथम- अभिजीत पटवर्धन (वामन आख्यान), द्वितीय- भूषण भावसार (कर्ण), तृतीय- अभिजीत इनामदार (हृदयी संत फुलताना), वेशभूषा : प्रथम- गायत्री चक्रदेव (आनंदमठ मिशन वंदे मातरम्), द्वितीय- प्रतिभा शेंडे (कर्ण) तृतीय- दिक्षा कुळ्ये (वामन आख्यान) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रणव भोसले (भिरुड) व पल्लवी भालेकर (गेला बाजार).