बारामतीकरांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे – किशोर मासाळ

बारामती (प्रतिनिधी) : कोरोना सारख्या विषाणूजन्य रोगाचे जागतिक संकट बारामती पर्यंत पोहोचले आहे. जळोची श्रमिक नगर येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर जळोची गावा १०० टक्के सील केले .आहे तरी प्रशासन व पोलीसांना सहकार्य करा अन्यथा वेळ माफ करणार नाही असे आवाहन प्रदेश युवक राष्ट्रवादी उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी केले आहे.
जळोची परिसरातील भिगवण रोड, श्रमिकनगर, त्रिमूर्तींनगर, श्रीरामनगर, सुर्यनगरी, तांबेनगर, जळोची गावठाण पुर्णपणे सील करण्यात आले आहे.नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता संयम राखावा. प्रशासनाकडून येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत . त्यांनी सांगितल्याप्रमाणे जनतेने स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे.
बारामतीकर म्हणुन सर्वांनी आपल्या घरातच थांबून या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करावी. गरज असल्याशिवाय घरातून कोणीही घराबाहेर पडू नये. नागरिकांनी प्रशासनाला व पोलीसांना सहकार्य करावे. आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी केले आहे.





