बारामतीच्या महिला पोलिसाचा डेंग्यूने म्रुत्यू

बारामती – बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने म्रुत्यु झाला.शीतल जगताप गलांडे,असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते.त्यांच्या निधनानं अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बालक पोरक झाले आहे.
शीतल या त्या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपाचारासाठी त्यांना के ई म रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचे निधन झाले. शितल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या.
प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या .पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या.पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे.शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी आज सकाळी दहा वाजता पणदरे इथं करण्यात येणार आहे.





