Baramati News : पिंपळी लिमटेकमध्ये निरा डावा कालव्याला पडले भगदाड

डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याला पिंपळी लिमटेक या ठिकाणी भगदाड पडले. या कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या शेतात आणि घरामध्ये शिरले असून यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालय… निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरूच होते.
त्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कालव्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला यामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे.. कालव्याला पिंपळी लिमटेक भागात भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने नीरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे..
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये..
बारामती तालुक्यात अतिवृष्टी होत असून नदी पात्र, कॅनॉल परिसरात नागरिकांनी जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनास सहकार्य करावे, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.





