बारामती : मनोहर भोसलेला आणखीन तीन दिवसाची पोलीस कोठडी

Updated On:
बारामती : मनोहर भोसलेला आणखीन तीन दिवसाची पोलीस कोठडी

बारामती :  संत श्री. बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात दि. 10 सप्टेंबरपासून पोलीस कोठडीत असलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले याच्या पोलीस कोठडीत बारामती न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली. 11 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.

दरम्यान, न्यायालयाने मनोहर मामा भोसले याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली होती आणि ती आज रोजी गुरुवारी संपल्याने तालुका पोलिसांकडून त्याला न्यायाधीश एन. व्ही. रणवीर यांच्यापुढे हजर करण्यात आले होते.

मागील वेळी प्रमाणे आजही मनोहर भोसले याच्या भक्तानी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. भोसले याच्या बाजूने ॲड. हेमंत नरुटे यांनी म्हणणे मांडले तर सरकार पक्षाकडून ॲड. एन.पी. कुचेकर यांनी काम पाहिले.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

2026-10-05 12:29:01

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

2026-10-04 19:35:02

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती