बारामती सहकारी बँकेची विक्रमी झेप: 3577 कोटींचा व्यवसाय, 71 कोटींचा ढोबळ नफा!

बारामती: बारामती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 3577 कोटी रुपयांचा व्यवसाय करत 71 कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला असून, आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक नफा नोंदवला आहे. बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी ही माहिती देताना सांगितले की, सर्व वैधानिक तरतुदी पूर्ण करून बँकेने 11.63 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.
बँकेच्या या यशस्वी वाटचालीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाचे ठरले आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार नावीन्यपूर्ण उत्पादने सादर करत बँकेने प्रगतीचा आलेख उंचावला आहे. अध्यक्ष सातव यांनी बँकेच्या संचालक मंडळासह सर्व ग्राहक, ठेवीदार, कर्जदार आणि भागधारकांचे आभार मानले.
या यशात उपाध्यक्ष विजयराव गालिंदे, तज्ञ संचालक प्रितम पहाडे (सी.ए.), अॅड. शिरीष कुलकर्णी, संचालक रोहित घनवट, किशोर मेहता, देवेंद्र शिर्के, उद्धव गावडे, नामदेवराव तुपे, जयंत किकले, रणजित धुमाळ, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, नुपूर शहा, डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. अमोल गोजे, अॅड. रमेश गानबोटे, शांताराम भालेराव, कार्यकारी संचालक रविंद्र बनकर आणि मुख्य सरव्यवस्थापक विनोद रावळ यांच्यासह कर्मचारी वृंदाचे योगदान महत्त्वाचे आहे, असे सातव यांनी नमूद केले.
तपशिल रक्कम कोटीत –
-भाग भांडवल (५३.४४)
-ठेवी (२१९१.१६)
-कर्ज( १३८५.५२) भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR)
(१५.५१% )ढोबळ एनपीए (NPA) प्रमाण(६.४९%)
-निव्वळ एनपीए (NPA) प्रमाण (०.००%)
-प्रोव्हिजन कव्हरेज प्रमाण (PCR)(१००.००%)
भविष्यातील बँकेच्या अभिनव सेवा उद्दिष्टे –
-बँकेने देशामधील मोठ्या नागरी सहकारी बँकापैकी प्रथम १० बँकांमध्ये स्थान मिळविणे
-ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यावर बँकेचे प्रथम प्राधान्य
-बँकेचे कार्यक्षेत्र व शाखाविस्तार
-डिजिटलायझेशनद्वारे अत्याधुनिक बँकिंग सुविधा
-जलद आणि सुरक्षित व्यवहार
-कर्जवाटप विस्तार
-नवीन तंत्रज्ञानाचा वापर




