बारामती शहर पोलिसांची दारू अड्ड्यावर कारवाई

बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळी येथे गावठी हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बारामती इंदापूर रोड वरील पिंपळी गावच्या हद्दीत कॅनॉल लगत असणाऱ्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला असता गावठी हातभट्टीची दारू, रसायन व दारूचे साहित्य मिळून आले. याप्रकरणी अलका शशिकांत पवार (रा. इंद्रायणी नगर, पिंपळी ता. बारामती) यांच्यासह दारुसाठी कच्चामाल देणाऱ्या दुकानदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या अधिपत्याखाली पोलीस फौजदार संदिप गोसावी, सुरेश भोई, तानाजी गावडे, संदेश ओमासे, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहूल लाळगे, शरद गावडे, जयश्री गवळी, लता हिंगणे यांनी केली.





