बारामती – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते, पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आहे.
सोमवारी (दि.12) रोजी काष्ठशिल्प प्रदर्शन सकाळी दहा वाजता, ग्रंथ प्रदर्शन दुपारी एक ते तीन, कवी संमेलन दुपारी तीन ते पाच मुशाहिरा व राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ. दि. 13 ते 18 या कालावधीमध्ये राज्यातील हौशी नाट्य संस्थांचा राज्यपातळीवरील एकांकिका सादर होतील.
बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शहर व गावठाणातील देवतांना अभिषेक घातला जाणार आहे. यावेळी मोफत थॉयरॉइड तपासणी, एच. बी. तपासणी रक्तदान शिबीर आहे. त्यानंतर केक कापला जाणार आहे. एन्व्हार्यमेंटल फोर ऑफ इंडियाच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.