बारामती | खासदार सुळेंविरोधात वक्तव्य केल्याबद्दल कराडकरांची प्रतिमा दहन

Updated On:
बारामती | खासदार सुळेंविरोधात वक्तव्य केल्याबद्दल कराडकरांची प्रतिमा दहन

बारामती/ डोर्लेवाडी (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सातारा याठिकाणी बंडातात्या कराडकर यांनी अपमानकारक शब्द वापरल्याबद्दल बारामती बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने कराडकर यांच्या पुतळ्याचे दहन करून व जोडे मारून तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त केला.

निषेधानंतर कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. याकरिता बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष धनवान वादक, पुणे जिल्हा समाजकल्याण दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य साधू बल्लाळ, बारामती शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विशाल जाधव, बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष ॲड. रवींद्र माने, बारामती तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष सुनील बनसोडे, बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा वनिता बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिता गायकवाड, बारामती शहर युवती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा आरती शेंडगे, बारामती खरेदी विक्री संघाचे संचालक विजय शिंदे, नगरसेवक नितीन बागल, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस शबीर शेख, तालुका सोशल मीडियाचे उपाध्यक्ष पैगंबर शेख, तालुका सोशल मीडियाचे सरचिटणीस सूर्यकांत पिसाळ, नितीन बागल, सुधाकर माने,योगेश पवार, विकास यादव, विशाल जाधव, संभाजी लालबिगे, सुभाष मोहिते, दीपाली पवार, रेहेना शिकीलकर, विजयालक्ष्मी आळीगी, पुष्पा देवकाते, ज्योती जाधव, मंदा अमरोळे, वंदना भंडारे, जयश्री शिंदे, आशा शेलार उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

2026-10-05 12:29:01

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

MPSC Protest: "रोहित पवार एकटे पडले का?" एमपीएससी आंदोलनाला फक्त काँग्रेसची साथ; राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गायब

2026-10-05 05:30:22

MPSC Protest: "रोहित पवार एकटे पडले का?" एमपीएससी आंदोलनाला फक्त काँग्रेसची साथ; राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गायब

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

2026-10-04 19:35:02

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी