Baramati and Rahuri : बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. तर राहुरीच्या जागेवर शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणूक रिंगणात आहेत. बारामतीत राष्ट्रवादीचंच पारडं जड आज सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार मतदान करणार आहेत. त्याआधी सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या विद्याप्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. बारामतीच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. sunetra pawar मात्र, काँग्रेसने ही जागा लढवणार निर्धार केला होता. मात्र नंतर काँग्रेसने आपला उमेदवार अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता बारामतीची निवडणूक बिनविरोध होत नसली तरी या ठिकाणी राष्ट्रवादीचंच पारडं जड आहे. तर अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि इतर अपक्ष तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतमोजणी 4 मे 2026 रोजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली. दरम्यान, बारामती आणि राहुरी पोटनिवडणूकीसाठी आज 23 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडल्यानंतर मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे. हेही वाचा: Mahila Congress Protest : “आरक्षण लागू करा, नाहीतर खुर्चा खाली करा!” पुण्यात महिला काँग्रेस आक्रमक