पिंपरी | बापू भेगडे यांची विधानसभेसाठी तयारी

पवनानगर (वार्ताहर) – जस जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. तस तसे सर्व पक्षीयांकडून मतदार संघात मोर्चे बांधणीला सुरूवात करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवार मतदारसंघात सभा, बैठका घेताना दिसत आहे. तर मागील आठवड्यात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी पत्रकार परिषद घेत मावळ विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर गणेश उत्सवानिमित्त मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात गावभेट दौरा व गणेश मंडळांच्या भेटी गाठी घेण्यात येत आहे. तर या दौऱ्याला पवनमावळ मधून सुरूवात झाली असून या दौऱ्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.
त्यामुळे हा दौरा नागरिकांचा चर्चेचा विषय बनला आहे. बापू भेगडे यांनी जणू मावळ विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे अश्या चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहे.
या गाव भेट दौराला ९ तारखेला सुरूवात झाली असून अंदर मावळ, नाणे मावळ, तळेगाव, देहूरोड, तर १५ तारखेला हा दौरा लोणावळा येथे संपन्न होणार आहे. तर उद्या तळेगावातील (दि.११) रोजी ५ हजार कार्यकर्त्यांना सोबत मंडळांच्या भेटी घेणार आहे अशी माहिती बापू अण्णा भेगडे मित्र परिवाराने दिली आहे.
यंदा माघार घेऊ नका….
मावळ तालुक्यातील गावभेट दौरा व गणेश मंडळांना भेटी देत असताना गावातील नागरिकांनी भावना व्यक्त केल्या की यंदा बापू आण्णा तुम्ही माघार घेऊ नका.
यंदा तुम्हाला या तालुक्याचे आमदार म्हणून आम्हाला बघायचे आहे. तुम्हाला आम्ही मोठ्या मताधिक्याने विजयी करू अशा भावना यावेळी बोलताना नागरिकांनी व्यक्त केल्या.





