लघु उद्योगांना बॅंकर्स मदत करणार
Updated On:

कोलकाता – लॉकडाऊन संपले तरी लघुउद्योगांना बॅंका भांडवल पुरवठा सढळ हाताने करतील, असे आश्वासन बड्या बॅंकांनी दिले आहे.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये बोलताना स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अर्जित बसू यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारतमध्ये लघुउद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. यासाठी बॅंका लघुउद्योगाच्या पाठीशी उभ्या राहणार आहे. पंजाब नॅशनल बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन राव यांनी सांगितले की, आम्ही एक पाऊल पुढे येऊन या क्षेत्राला मदत करू.





