Bank strike : बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! देशव्यापी संप; सलग 3-4 दिवस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता
Bank strike : पाच दिवसांचा बँकिंग आठवडा, प्रोत्साहन योजना आणि निवृत्तीवेतनाच्या मागण्यांसाठी बँक संघटनांनी 11 सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे.

Bank strike : पाच दिवसांच्या बँकिंग सेवेच्या अंमलबजावणीतील विलंब, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजनेवरील मतभेद आणि निवृत्तीवेतनाशी संबंधित मुद्द्यांसह अनेक प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 11 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
जर हा संप झाला, तर देशाच्या अनेक भागांमध्ये चार दिवस बँकिंग सेवावर परिणाम होईल. 11 सप्टेंबर हा शुक्रवार असून, त्यानंतरचे दोन दिवस बँकांना सुट्टी आहे. काही राज्यांमध्ये 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सुट्टी आहे.
नऊ बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची शिखर संस्था असलेल्या संघटनेने, म्हणजेच 28 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या देशव्यापी संपाचा इशाराही दिला आहे. जर सरकार आणि बँक व्यवस्थापनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर 26 ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचाही त्यांनी निर्णय घेतला आहे.





