Bank of Maharashtra : पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जपुरवठ्यात तिसर्या तिमाहीत 19.61% वाढ होऊन कर्ज पुरवठा 2.73 लाख कोटी रुपयावर गेला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीअखेर या बँकेचा कर्जपुरवठा 2.29 लाख कोटी रुपये इतका होता. या रकमेत कंपन्यांना दिलेल्या 1.02 लाख कोटी रुपयांचा आणि रिटेल, सेवा आणि लघु उद्योगांना दिलेला 1.71 लाख कोटी रुपयाचा समावेश आहे. तिसर्या तिमाहित बँकेच्या ठेवीत 15.3 टक्क्यांनी वाढून 3.22 लाख कोटी रुपये इतक्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीअखेर ही रक्कम 2.79 लाख कोटी रुपये होती. अशा परिस्थितीत या बँकेचा तिसर्या तिमाहीअखेर एकूण व्यवसाय म्हणजे कर्ज आणि ठेवी 17.24 टक्क्यांनी वाढून 5.95 लाख कोटी रुपये इतक्या झाल्या आहेत. 31 डिसेंबर 2024 रोजी ही रक्कम 5.08 लाख कोटी रुपये होती. बँकेच्या चालू खाते आणि बचत खात्यातील ठेवी हे वाढत असून या खात्यातील रक्कम 1.59 लाख कोटी रुपयावर गेली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 1.37 लाख कोटी रुपये होती, असे बँकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.