Bank Robbery : झारखंडमधील बरही येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. अवघ्या १५ मिनिटांत दरोडेखोरांनी सुमारे ६ कोटींहून अधिक किमतीचे सोने आणि रोकड लंपास करत धक्कादायक घटना घडवली. (Bank Robbery) शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून, ५ जणांच्या टोळीने नियोजनबद्ध पद्धतीने हा दरोडा टाकल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास दोन जण चालू खाते उघडण्याच्या बहाण्याने बँकेत शिरले. त्यानंतर त्यांच्या इतर साथीदारांनीही प्रवेश केला. (Bank Robbery) यानंतर सर्वांनी शस्त्रांचा धाक दाखवत बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस धरले. विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना एका खोलीत कोंडून तिजोरीच्या चाव्या घेतल्या आणि बँकेतील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. (Bank Robbery) या दरोड्यात सुमारे ४ किलो सोने आणि अंदाजे ५ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. या सोन्याची किंमत ६ ते ७ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. पळून जाताना दरोडेखोरांनी बँकेला बाहेरून कुलूप लावून कोणीही पाठलाग करू नये, याची खबरदारी घेतली. (Bank Robbery) घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असला तरी अद्याप ते फरार असल्याची माहिती समोर आली आहे. (Bank Robbery)