नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील महाराष्ट्र बँकेने मंगळवारी तिसर्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. या तिमाहित बँकेचा नफा 27% वाढून 1,779 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहित बँकेला 1,406 कोटी रुपयांचा नफा झाला होता. ताळेबंद जाहीर करताना बँकेचे व्यवस्थापकीय संचालकन निधू सक्सेना यांनी सांगितले की, बँकेने भागधारकासाठी दहा रुपयाच्या शेअरवर एक रुपयाचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. या तिमाहीत बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 1.60 टक्के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहित ही ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 1.80% होती. बँकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 0.2% वरून 0.15% वर आली आहे. यामुळे बँकेला खराब कर्जापोटी केवळ 728 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. गेल्या वर्षी ही रक्कम 841 कोटी रुपये इतकी होती.