पुणे – बॅंक असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रने आपल्या गृह कर्ज व चारचाकी वाहन कर्ज ग्राहकांसाठी डिजिटल कर्जाचा मंच सुरु केला. त्यामुळे संभाव्य रिटेल कर्ज ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी व सोईस्कर वेळेत कागदपत्र विरहित प्रक्रियेचा अवलंब करून डिजिटल माध्यमाद्वारे कर्जाकरीता अर्ज करता येईल.
सदर सुविधेद्वारे ग्राहकाचे केवायसी, सिबिल व वित्तीय तपशील पडताळून घेण्याची सोय सुद्धा आहे.बॅंकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन संभाव्य ग्राहक उपरोक्त सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए एस राजीव यांनी सदर डिजिटल सुविधेचे लोकार्पण केले. बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा व ए बी विजयकुमार यावेळी उपस्थित होते. सध्याच्या उत्सवी उत्साही वातावरणात ग्राहकांना खरेदीचा आनंद सुलभतेने घेता यावा म्हणून बॅंकेने गृह व चारचाकी वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले असून या कर्ज योजनांचे व्याजदर सुद्धा अतिशय आकर्षक ठेवण्यात आले आहेत.