पुणे – देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने गृह, चारचाकी वाहन, शिक्षण यासह रेपो दरांशी जोडलेल्या अन्य कर्ज योजनांच्या व्याजदरात 0.25% घट केली आहे. गृह व चारचाकी कर्जांवरील प्रक्रिया शुल्क बँकेने अगोदरच माफ केले आहे. प्रक्रिया शुल्कातील माफी आणि व्याज दरातील घट या दुहेरी लाभामुळे आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचा दाखवून देत आहे. उच्च व्याजदराच्या आजकालच्या वातावरणात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बँक आपली रिटेल क्षेत्रातील कर्जे स्वस्त दराने देऊ करीत आहे. सद्य स्थितीत बँक ऑफ महाराष्ट्र, 8.10% पासून गृह कर्ज व 8.45% पासून चार चाकी वाहनासाठी कर्ज देऊ करत असून बँकिंग उद्योगातील सर्वात कमी व्याजदराने कर्ज देणार्या बँकपैकी एक आहे. गृह कर्जाच्या सुधारित व्याजदरांसाठी व प्रक्रिया शुल्कात सूट दिल्याबाबत तसेच बँक ऑफ महाराष्ट्र देऊ करीत असलेल्या अन्य सर्व वित्तीय सेवांच्या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.