महाराष्ट्र बॅंकेकडून रिटेल कर्जावरील प्रक्रिया शुल्क रद्द

पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने सुवर्ण कर्ज, गृहकर्ज आणि कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क रद्द केले आहे. महासाथीच्या काळात आपल्या रिटेल कर्जग्राहकांमधे उत्साह आणण्यासाठी सणासुदीच्या काळात अनेक खास योजना बॅंकेने सादर केल्या आहेत.
गृहकर्ज आणि कार कर्जासाठी बॅंकेने व्याजाचे दर अनुक्रमे 7.05% आणि 7.70% पासून पुढे ठेवले आहेत. याशिवाय स्थावर मालमत्तेवरील आणि गृहकर्जासाठी विशेष मोहीम चालू केली आहे. बॅंकेच्या असलेल्या ग्राहकांसाठी परतफेडीची मुदत अनुक्रमे 10 व 30 वर्षे इतकी ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बॅंकेने आपल्या सुवर्ण कर्ज योजनेची फेररचना केली आहे. रु. 20 लाखांपर्यंत कर्जासाठी शून्य प्रक्रिया शुल्क आणि 7.50% इतका आकर्षक व्याजदर राहील. तसेच बॅंकेने आपल्या निवडक शाखांमध्ये गोल्ड लोन पॉईंट हे विशेष काऊंटर चालू केले आहेत. जेथे सुवर्णकर्ज प्रक्रिया फक्त 15 मिनिटात पूर्ण होईल.
बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा म्हणाले की, आता आर्थिक कार्यप्रकल्प चालू होत आहेत आणि आपल्या शाखांमध्ये विनाअडथळा सुवर्णकर्ज मंजूर झाल्यामुळे आमच्या ग्राहकांना आपल्या तातडीच्या आर्थिक गरजांसाठी रोखलेल्या अडचणींवर मात करता येईल.





