ऑगस्ट महिना जवळजवळ संपत आला आहे. पुढच्या म्हणजेच सप्टेंबर महिन्यात गणपती असल्याने सगळ्यांना या गणपतीचे वेध लागले आहे. या महिन्यात गणेशोत्सवाबरोबरच अनेक सण असल्याने त्याचा परिणाम बँकेच्या व्यवहारांवर होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तब्बल १४ दिवस बँका बंद राहणार आहेत.
या महिन्यात सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त प्रादेशिक आणि धार्मिक उत्सव आहेत. त्याशिवाय दोन शनिवार आणि पाच रविवार सुट्टी असणार आहे. भारतातील बँकांच्या सुट्ट्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या आहेत. आता आपण बँकेची संपूर्ण सुट्ट्यांची यादी पाहुयात ज्यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित कामाचं नियोजन करता येईल.
जाणून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
१ सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत
७ सप्टेंबर – विनायक चतुर्थी – संपूर्ण भारत
८ सप्टेंबर – रविवार / नुआखाई – संपूर्ण भारत / ओडिशा
१३ सप्टेंबर – रामदेव जयंती / तेजा दशमी (शुक्रवार) – राजस्थान
१४ सप्टेंबर – दुसरा शनिवार / ओणम – संपूर्ण भारत / केरळ
१५ सप्टेंबर – रविवार / तिरुवोणम – संपूर्ण भारत / केरळ
१६ सप्टेंबर – ईद ए मिलाद (सोमवार) – संपूर्ण भारत
१७ सप्टेंबर – इंद्र जत्रा (मंगळवार) – सिक्कीम
१८ सप्टेंबर – श्री नारायण गुरु जयंती (बुधवार) – केरळ
२१ सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी (शनिवार) – केरळ
२२ सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत
२३ सप्टेंबर – वीर बलिदान दिन (सोमवार) – हरियाणा
२८ सप्टेंबर – चौथा शनिवार – संपूर्ण भारत
२९ सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत