Bank Holiday December 2025 : पुढील महिन्यात बँकेत काही महत्त्वाची कामे असतील तर ती वेळेत आटोपून घ्या. डिसेंबर २०२५ हा महिना बँकिंग ग्राहकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण या महिन्यात तब्बल १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे काही राज्यांमध्ये तर सलग ५ दिवस बँका बंद राहतील, त्यामुळे अनेकांचे कामकाज अडचणीत येऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या सुट्ट्या राष्ट्रीय सण, राज्यस्तरीय सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे निश्चित करण्यात आल्या आहेत. बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी : १ डिसेंबर – राज्यस्तरीय सण – अरुणाचल प्रदेश, नागालँड ३ डिसेंबर – राज्यस्तरीय सण – गोवा ७ डिसेंबर – साप्ताहिक सुट्टी (रविवार) – संपूर्ण देश १२ डिसेंबर – राज्यस्तरीय सण – मेघालय १३ डिसेंबर – दुसरा शनिवार संपूर्ण – देश १४ डिसेंबर – साप्ताहिक सुट्टी (रविवार) – संपूर्ण देश १८ डिसेंबर – राज्यस्तरीय सण – मेघालय १९ डिसेंबर – राज्यस्तरीय सण – गोवा २० डिसेंबर – राज्यस्तरीय सण – सिक्कीम २१ डिसेंबर – साप्ताहिक सुट्टी (रविवार) – संपूर्ण देश २२ डिसेंबर – राज्यस्तरीय सण – सिक्कीम २४ डिसेंबर – राज्यस्तरीय सण – नागालँड, मिझोराम, मेघालय २५ डिसेंबर – राष्ट्रीय सुट्टी (ख्रिसमस) – संपूर्ण देश २६ डिसेंबर – राज्यस्तरीय सण – नागालँड, मिझोराम, मेघालय २७ डिसेंबर – चौथा शनिवार – संपूर्ण देश २८ डिसेंबर – साप्ताहिक सुट्टी (रविवार) – संपूर्ण देश ३० डिसेंबर – राज्यस्तरीय सण – मेघालय ३१ डिसेंबर – राज्यस्तरीय सण – मणिपूर, मिझोराम – नागालँड, मिझोराम आणि मेघालयमध्ये सलग ५ दिवस बँका बंद. – या तीन राज्यांमध्ये २४ ते २८ डिसेंबर दरम्यान बँकांचे कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे. – म्हणजेच, सलग ५ दिवसांचा मोठा बँक ब्रेक येथे लागू होईल. ऑनलाइन बँकिंग सेवा सुरूच : बँकांच्या प्रत्यक्ष शाखा बंद असल्या तरीही, – नेट बँकिंग – मोबाईल बँकिंग – UPI – ATM सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. म्हणून ग्राहकांनी रोख रक्कम काढणे, चेक जमा करणे किंवा अन्य महत्वाची कामे आधीच उरकून घेणे फायद्याचे होणार आहे.