Accident News : बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू

सांगली : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशीच एक अपघाताची घटना सांगली जिल्ह्यातील बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे रहिवाशी होते. या अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
काय घडले नेमके?
बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्याने इप्पाळगोळ हे कुटुंब आपल्या गावकडे येत होते. त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कारवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृतांमध्ये पती चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (16), मुली दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम इगाप्पागोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) यांचा समावेश आहे.
चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते, या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंबच मृत्यूमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





