Bangladesh Cricket : चंडिका हथुरुसिंघांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी, समोर आलं ‘हे’ कारण….

Bangladesh Cricket – बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा (Chandika Hathurusingha) यांनी गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत अनुचित वर्तन केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. बांगलादेशने नुकताच भारताचा दौरा केला होता. यामध्ये बांगलादेशला कसोटीमध्ये 0-2 तर टी-20 मध्ये 0-3 असा व्हाईट वॉश स्वीकारावा लागला होता. आता हथुरुसिंघा यांच्या जागी वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू फिल सिमन्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ईएसपीएन क्रिक इन्फोच्या मतानुसार, सिमन्स हे 1990 च्या दशकातील अष्टपैलू खेळाडू होते. ते पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडकापर्यंत बांगलादेशची जबाबदारी सांभाळतील. चंडिका हथुरुसिंघा यांनी गेल्यावर्षी विश्वकरंडक स्पर्धेत एका खेळाडूला चापट मारल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाची बीसीबीने चौकशी देखील केली होती.
🚨 JUST IN: Chandika Hathurusingha has been suspended as Bangladesh’s Head Coach with immediate effect.
Phil Simmons named interim coach until the end of the 2025 Champions Trophy pic.twitter.com/WNoP6PBtcO
— Cricbuzz (@cricbuzz) October 15, 2024
56 वर्षांच्या हथुरुसिंघा यांचा करार चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर संपणार होता. मात्र, निलंबनाच्या 48 तासानंतर त्यांचा करार संपुष्टात येणार असल्याने वेबसाईटने म्हटले आहे. त्यामुळे आता हथुरुसिंघा हे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी संघासोबत नसतील.
IND vs NZ 1st Test : बेंगळुरू कसोटीवर पावसाचे सावट, हवामान खात्याने दिला ‘हा’ अलर्ट…
हथुरुसिंघांच्या कारकिर्दीत संघाला संमिश्र यश
बांगलादेश संघाने पाकिस्तानमध्ये दोन कसोटीची मालिका 2-0 अशी जिंकली होती. मात्र, भारतामध्ये बांगलादेश संघाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. कसोटीमध्ये भारताने बांगलादेशला 2-0 तर टी-20 मध्ये 3-0 असे पराभूत केले होते. हथुरुसिंघा यांच्या छोट्या कारकिर्दीत बांगलादेश संघाला संमिश्र यश मिळाले होते.





