Bangal Election Result : “आता दाढी करा अन् जे करून ठेवलं ते निस्तरा”

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का देत तृणमूल काँग्रेस पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात आघाडी घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. यावरून अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र त्याचवेळी तृणमूल काँग्रेस सत्ता कायम राखणार असंही बोललं जात होतं. यावरून प्रकाश राज यांनी ट्विट करून मोदींना म्हटलं की, “डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवणं थांबवा. नागरिकांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा”.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने निर्णायक आघाडी घेतली आहे. टीएमसी कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे.

