Banana For Skin: धूळ, प्रदूषण, ऊन आणि बदलती जीवनशैली याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या त्वचेवर होताना दिसतो. त्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो, टॅनिंग वाढते आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो कमी होतो. अनेकजण यासाठी महागडी ब्युटी प्रॉडक्ट्स किंवा ट्रीटमेंट्स वापरतात. मात्र, त्यातील केमिकल्समुळे त्वचेला नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली केळी त्वचेसाठी खूप उपयुक्त मानलं जातं. केळांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक त्वचेला पोषण देतात, त्वचा मऊ ठेवतात आणि नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात. विशेष म्हणजे केळांमध्ये काही नैसर्गिक पदार्थ मिसळून फेसपॅक तयार केल्यास त्वचेवर अधिक चांगला परिणाम दिसून येतो. केळी आणि मधाचा फेसपॅक (Banana For Skin) त्वचेला नैसर्गिक ग्लो हवा असेल तर केळी आणि मधाचा फेसपॅक खूप फायदेशीर ठरू शकतो. यासाठी अर्धं पिकलेली केळी मॅश करून त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून चेहऱ्यावर लावावं. सुमारे २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. केळी त्वचेला पोषण देतात, तर मध त्वचेला मॉइश्चराइज करून मऊ आणि चमकदार बनवतं. Banana Peel On Face केळी आणि दह्याचा फेसपॅक केळी आणि दही यांचा फेसपॅकही त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. अर्धं पिकलेली केळी मॅश करून त्यात दही मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर १५ मिनिटं ठेवून नंतर थंड पाण्याने धुवावं. दह्यातील लॅक्टिक अॅसिड मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतं. त्यामुळे त्वचा स्वच्छ दिसते आणि चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यास मदत होते. (Banana For Skin) केळी आणि बेसनचा फेसपॅक जर त्वचेवर खूप टॅनिंग झाली असेल तर केळी आणि बेसनचा फेसपॅक फायदेशीर ठरू शकतो. अर्धं मॅश केलेली केळी आणि एक चमचा बेसन एकत्र करून चेहऱ्यावर लावावं. हा पॅक वाळल्यानंतर हलक्या हाताने घासून काढावा. यामुळे डेड स्किन दूर होते, त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हात-पाय आणि मानेवरही हा पॅक वापरता येतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि प्रभावी मानले जातात. मात्र, कोणताही फेसपॅक वापरण्यापूर्वी त्वचेवर छोटासा पॅच टेस्ट करून पाहणं आवश्यक आहे. त्वचेची समस्या जास्त असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.