BAN vs IND – भारत आणि बांगलादेश यांच्यात आज मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारतीय संघाची सलामी जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा अपयशी ठरले. यानंतर विराट आणि श्रेयस अय्यर देखील फ्लॉप राहिले.
#BANvsIND | विराट कोहलीचा ‘तो’ कॅच पाहून सगळेच शॉक; फलंदाजाला तर विश्वासच बसेना!
भारतीय संघाकडून केएल राहुलने सावध फलंदाजी करत ७० चेंडूत ७३ धावांची खेळी खेळली. याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने ५ गडी बाद केले. भारताने दिलेल्या १८७ धावांच्या प्रत्युत्तरात यजमान बांगलादेश संघाने ४६ षटकात १ गडी राखून विजय मिळवला.
#BANvsIND | विराट कोहलीचा ‘तो’ कॅच पाहून सगळेच शॉक; फलंदाजाला तर विश्वासच बसेना!
भारतीय संघाने शेवटच्या क्षणी हातात आलेला सामना गमावला. कारण भारतीय संघाला शेवटच्या काही षटकांमध्ये फक्त एक गडी बाद करायचा होता. मात्र क्षेत्ररक्षणात यष्टीरक्षक केएल राहुलने सामन्याच्या हिरो ठरलेल्या मेहदी हसन याचा झेल सोडला आणि मोठी चुक केली. यानंतर मेहदीने चिकाटीने फलंदाजी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला.
Things went right down to the wire but it was Bangladesh who won the first ODI.#TeamIndia will look to bounce back in the second ODI of the series 👍 #BANvIND
Scorecard 👉 https://t.co/XA4dUcD6iy pic.twitter.com/Ko3Snyqdpp
— BCCI (@BCCI) December 4, 2022
सामान्यांच्या सुरुवातीला बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर अपयशी ठरला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय संघाला १८६ धावांवरच रोखले. केएल राहुलने एकाकी झुंज देत ७३ धावांची अर्धशतकीय खेळी केली. याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. कर्णधार रोहित आणि विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र दोघेही अनुक्रमे २७ आणि ९ धावांवर एकाच षटकात बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला.