श्रीलंकेत सोशल मीडियावरील बंदी अखेर मागे

कोलोंबो – श्रीलंकेत सोशल मीडियावर घातलेली बंदी सरकारने रविवारी मागे घेतली. देशभरात आर्थिक आपत्तीच्या पार्श्वभुमीवर आणीबाणी लागू केल्यानंतर सरकारने ही बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला.
सरकार विरोधात काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्च्याच्या पार्श्वभुमीवर देशभरात 36 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातील 15 तासांची संचारबंदी पूर्ण झाल्यानंतर सरकारने फेसबुक, ट्विटर, युट्युब, इन्स्टाग्राम, टिक टॉक, स्नॅपचॅट, व्हॉटस ऍप, व्हिबर, टेलिग्राम आणि पेसबुक मेसेंजर सारख्या सोशल मीडियाचे कास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोशल मीडियाचे काम अंशतः किंवा पूर्णतः बंद करण्यातच आले होते.
अन्नपदार्थ, इंधन, तेल, आणि औषधांच्या तुटवड्यामुळे सरकारविरोधात कोलोंबो इथे काढण्यात येणाऱ्या मोर्च्याला रोखण्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर ही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापूर्वी 29 मार्च पासून देशभरातील इंटरनेट संथ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.





