ड्रोनवर बंदी, कलम 144 लागू…; दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान असणार कडक सुरक्षा व्यवस्था

PM Narendra Modi| नरेंद्र मोदी उद्या 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहे. ड्रोन उडवण्यास आणि पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. 9 आणि 10 जून रोजी दिल्लीत कलम 144 लागू होणार आहे. राष्ट्रपती भवनाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी हे रविवारी सायंकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी एसपीजी, राष्ट्रपती सुरक्षा रक्षक, आयटीबीपी, दिल्ली पोलिस, गुप्तचर विभागाचे पथक, निमलष्करी दल, एनएसजी ब्लॅक कॅट कमांडो आणि एनडीआरएफचे पथक उपस्थित राहणार आहेत.
याआधी केंद्रीय गृह मंत्रालय, राष्ट्रपती भवन सुरक्षा, दिल्ली पोलीस, एसपीजी, एनएसजी, आयबी आणि निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. एनएसजीकडे उपलब्ध असलेली ड्रोनविरोधी यंत्रणा शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केली जाईल. एनएसजीच्या मदतीने डीआरडीओ एन्ट्री ड्रोन सिस्टीमवरही नजर ठेवली जाणार आहे.
परदेशी पाहुण्यांसाठी खास सुरक्षा व्यवस्था तैनात PM Narendra Modi|
त्याचबरोबर ज्या हॉटेलमध्ये परदेशी पाहुणे मुक्कामी असणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी केंद्रीय एजन्सीच्या सल्ल्यानुसार स्वतंत्र अधिकारी नेमले आहेत. तसेच जी-20 दरम्यान स्वीकारण्यात आलेली सुरक्षा शपथविधीदरम्यानही स्वीकारली जातील.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्तचर विभागाचे अधिकारीही परदेशी पाहुण्यांसाठी तैनात करण्यात येत आहेत, जेणेकरून कोणत्याही पाहुण्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि सुरक्षेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये. परदेशी पाहुणे ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करत आहेत, त्या हॉटेलमधून शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजेच राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे.
दिल्लीत शहर परिसरात दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीटी) परिसरात ‘नो-फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात रविवारी विमानाच्या घिरट्या बंद असतील. 9 जून रोजी होणाऱ्या नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात ड्रोन उड्डाणांवर बंदी असेल. PM Narendra Modi|
दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर 7 जून रोजी एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक झाली, ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानुसार आता उद्या नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. PM Narendra Modi|
हेही वाचा:
ठाकरे गटाचे दोन नवनिर्वाचित खासदार आमच्या संपर्कात”; शिंदे गटाच्या ‘या’ खासदारांचा दावा





