जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या एक महिन्यात बिबट हल्ल्यात 5 मानवाचे बळी गेले आहेत. शेतकर्यांचा आक्रोश मोठा आहे. प्रशासन कामासाठी मुजोर व हतबल आहे. आक्रोश करणार्या पीडित गावच्या शेतकर्यांवर अमानुषपणे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह सर्वसामान्य जनतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी जुन्नर तहसील कार्यालय जुन्नर येथे सोमवारी (दि. 25) सर्वपक्षीय नेते, पदाधिका-यांनी पायी मोर्चा काढला होता. जुन्नरमधील पाच रस्ता चौकापासून सुरू झालेल्या सुरू झालेल्या त्या मोर्चामध्ये माजी आमदार शरद सोनवणे, बाळासाहेब दांगट, अंबादास हांडे, मोहित ढमाले, विश्वास आमले, मधुकर काजळे, संतोष चव्हाण, अविनाश कर्डिले, दीपेश परदेशी, संतोष वाघ, निलेश चव्हाण, संतोष घोटणे, जमीर कागदी, अंबादास डोके, सुरेखा वेठेकर, संतोष वाजगे सचिन थोरवे, मंगेश काकडे आदींसह धनगर समाज आपल्या मेंढरांसह सहभागी झालेले होते. तसेच शेतकरी बांधव आणि आणि पक्षीय राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.या मोर्चाच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार रवींद्र यांना सादर करण्यात आले. या आहेत मागण्या… उपवनसंरक्षक अधिकारी अमोल सातपुते यांना तातडीने निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा शासनाला 2018/19 माणिकडोह बिबट निवारा केंद्र जलसंपदाची जमीन वन विभागाने संपादीत करुन अधिकचे 300 बिबटे निवारा केंद्रात ठेवण्याबाबत पत्रव्यवहार केला होता त्याचा निर्णय तात्काळ करणे जुत्रर, आंबेगाव, खेड, शिरूर हे चार तालुके संवेदनशील बिबटक्षेत्र घोषित करून शेतकर्यांना दिवसा थ्री फेज वीज देण्यासाठी कायमस्वरुपी निर्णय व्हावा बिबट व मानव संघर्ष कमी करण्यासाठी पकडलेल्या सर्व बिबट्यांना अभयारण्यात पाठवून द्यावे जुन्नरमध्ये 100 वनअधिकारी अर्थात मनुष्यबळ व 300 पिंजरे ही सामग्री जलद गतीने मिळावी धनगर समाज हा भटकणारा समाज आहे, यांच्या प्रत्येक धनगर वाड्यावर आवाजाची बंदूक देण्यात यावी. बिबट हल्ल्यात पिडीत झालेल्या पिंपरीपेंढार, पिंपळवंडी, उंब्रज, काळवाडी या गावातील शेतकर्यांवर वनखात्याने सुडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहे ते तातडीने मागे घ्यावेत जनतेच्या तीव्र स्वरूपाच्या भावना समजून घेऊन वरिष्ठ पातळीवर तात्काळ या मागण्यांबाबत कार्यवाही व्हावी, या मोर्चाच्या भावना शासनापर्यंत कळविण्यात येणार आहे. – रवींद्र सबनीस, तहसीलदार, जुन्नर