वायएसआरसीपी पक्षाला मोठा धक्का ! ‘या’ 3 नेत्यांनी पक्षाला केला रामराम

विजयवाडा : आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) माजी आमदार बालिनेनी श्रीनिवास रेड्डी, समिनेनी उदय भानू आणि किलारी रोसैया यांनी विजयवाडा येथे जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री के पवन कल्याण यांच्या उपस्थितीत जनसेना पक्षात प्रवेश केला.
उदय भानू विधानसभेत वायएसआरसीपीचे माजी व्हिप होते, तर श्रीनिवास रेड्डी हे वायएसआरसीपी सरकारमध्ये माजी ऊर्जा मंत्री होते. पवन कल्याण यांनी गुरुवारी माजी आमदारांचे पक्षात स्वागत केले आणि तळागाळापर्यंत त्यांची विचारधारा पोहोचवून पक्ष मजबूत करा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.
माजी आमदारांचे पक्षांतर हा वायएसआरसीपीला मोठा धक्का आहे. पक्षाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. १७५ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत त्यांना केवळ ११ जागा मिळाल्या.





