बालिका वधू फेम अभिनेत्रीचा चाहत्यांना सुखद धक्का! गुपचुप उरकला साखरपुडा, सुंदर फोटो केले शेअर

Actress Avika Gaur : लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री अविका गौर हिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिने खऱ्या आयुष्यातील तिचा जोडीदार निवडला असून, अविकाने गुपचूप साखरडा उरकला आहे. तिने साखरपुड्याचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री अविका गौर हिने आजवर अनेक टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये काम केले आहे. थोडक्यात तिने छोटा पडदा तिच्या अभिनयाने गाजवला आहे. ती कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अविकाला बालिका वधू या मालिकेने ओळख मिळवून दिली. या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली होती. यामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. पुढे अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली.
आता अविकाने तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार शोधला असून, गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दिली आहे. मिलिंद चंदवानी असे तिच्या होणाऱ्या पतीचे नाव आहे. दोघेही गेल्या अनेक काही काळापासून एकमेकांना डेट करत होते. अविकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. अविकाने बेबी पिंक रंगाची साडी नेसली आहे. तर मिलिंदने तिच्या साडीला मॅचिंग असा शेरवानी परिधान केली आहे. या फोटोंना अविकाने हटके कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
अविकाची पोस्ट
“त्याने लग्नासाठी विचारले…मी हसले, मी रडले..आणि माझ्या आयुष्यातील हा सर्वात सिंपल होकार… मी पूर्णपणे फिल्मी आहे… पार्श्वसंगीत, स्लो-मो स्वप्ने आणि सर्व काही… तो लॉजिकल , शांत आहे …मी ˈमॅनिफेस्ट करते आणि तो ते सत्यात आणतो…म्हणून जेव्हा त्याने लग्नासाठी विचारले, तेव्हा माझ्यातील हिरोईन जागी झाली….हात हवेत असल्यासारखे वाटले, माझ्या डोळ्यात अश्रू आणि मनात कोणताही विचार उरला नाही…कारण खरे प्रेम? ते नेहमीच परिपूर्ण असू शकत नाही. पण, ते जादुई आहे…” अशी पोस्ट तिने फोटोंसोबत केली आहे. या फोटोंवर चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या असून आता चाहते तिच्या आणि मिलिंदच्या लग्नाची आतुरताने वाट पाहत आहेत.





